बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हॉट्सअप चॅटमधून राज कुंद्राच्या ‘या’ धक्कादायक गोष्टी आल्या समोर

मुंबई | सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे राज कुंद्राच्या अटकेचा. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक गोष्टींचा खुलासा होत आहे. अनेक नवीन गोष्टी समोर येत आहे. अशातच राज याची अश्लील व्हिडीओविषयी व्हाॅट्सअॅप चॅट समोर आली आहे. यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज कुंद्रानं या सर्व रॅकेटचा व्यवहार करण्यासाठी एक H accounts या नावानं 5 जणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये राज आणि प्रदीप बक्षी यांच्यात अश्लील व्हिडीओंविषयी बोलणं झालं आहे. प्रदीप बक्षी हे केनरिन प्रॉडक्शन हाऊसचे चेअरमन आहे. या कंपनीचा राज कुंद्राही पार्टनर आहे. या चॅटमध्ये अश्लील व्हिडीओच्या नफ्याविषयी बोलणं झालं आहे.

या व्हाट्सअप चॅटमध्ये अश्लील व्हिडीओमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनी किती रक्कम घेतली यावरही बोलण्यात आलं होतं. त्याचबरोबर अश्लील व्हिडीओला किती लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्रायबर मिळतात याविषयीही या ग्रुपमध्ये बोलणं झाल्याचं समोर येत आहे.

दरम्यान, या ग्रुपमध्ये राज कुंद्रा, अकाऊन्टट मेघा विहान, प्रदीप बक्षी, रॉय डिजिटल मार्केटिंग अकाऊन्ट, आणि रॉय इवेन्ट कन्टेट हेड या पाच जणांचा समावेश होता. या चॅटमध्ये या व्हिडीओतून कमावलेल्या पैशांचाही आकडा समोर आला आहे.

थोडक्यात बातम्या –  

“महाराष्ट्रातील ‘या’ दोन जिल्ह्यांमध्ये तातडीने लॉकडाऊन जाहीर करा”

“मोगॅम्बोचा आव आणणारे अनिल देशमुख आता मिस्टर इंडिया झालेत”

“…तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लोटांगण घातलं असतं”

शिल्पा शेट्टीचा पती प्रसिद्ध अभिनेत्रीला घेऊन कसा बनवायचा अश्लील चित्रपट?, पाहा आरोप

‘मी 5 वेळा मोबाईल बदलला पण…’; प्रशांत किशोर यांचा धक्कादायक आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More