निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी सरकार आजपर्यंत पाहिलं नाही!

मुंबई | प्रत्येक बाबतीत निर्लज्ज, खोटारडं आणि बेमालूम भ्रष्टाचारी असं राज्य सरकार मी यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

राज्यात एक लाख पंचवीस हजार विहिरी बांधणं असो, जलयुक्त शिवार योजना असो, की ‘हागणदारीमुक्त महाराष्ट्र’ ही घोषणा, प्रत्येक बाबतीत हे असचं आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

आधी शेकडो कोटी रूपयांच्या विकासनिधीच्या घोषणा करायच्या, मग त्याहून अधिक निधी जाहिरातींवर खर्च करायचा. त्याअखेरी योजनेच्या लाभार्थीची फसवी आकडेवारी लोकांसमोर मांडायची, ही या सरकारच्या कामाची पद्धत आहे, असां राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-इंदिरा गांधी असत्या तर आज मी काँग्रेस पक्षात असतो- शत्रुघ्न सिन्हा

-…तर खैरेंनी पक्षातून बाहेर पडावं; हर्षवर्धन जाधवांचा चंद्रकांत खैरेंवर हल्लाबोल

-…म्हणून अनुपम खेर यांनी दिला एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

-मी हाडाचा शिक्षक आहे त्यामुळे मला लोकसभेत जायला आवेडल- रामराजे नाईक निंबाळकर

-अमेरिकेत जन्माला आले म्हणून नागरिकत्वाचा अधिकार मिळणार नाही!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या