मुंबई | खड्ड्यांमुळे झालेली महाराष्ट्राची परिस्थिती दुर्दैवी असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी हे आपल्या फेसबुक पोस्टद्वारे खड्ड्यांची परिस्थिती मांडली.
खड्डेमय रस्त्यांमुळे सामान्य जनतेला हाल सोसावे लागत आहेत. ह्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यभर आंदोलनं सुरु आहे. ही आंदोलनं लोकांसाठी आहेत. असंवेदनशील सरकारी व्यवस्थेला जागं करण्यासाठी सुरु आहेत, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तम दर्जाचे रस्ते हा नागरिकांचा अधिकार आहे आणि तो जर त्यांना मिळत नसेल तर ह्याहून तीव्र आंदोलनं मनसे सैनिकांकडून होतील, असं त्यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या–
-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं
-शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-शिवसेनेबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं मोठं भाकीत
-गोदातिरी मराठा आमदारांच्या नावाने दशक्रिया विधी
-शेतकऱ्यांनी कायदा हातात घेऊन आंदोलन पुढं चालवलं- राजू शेट्टी