मुंबई | मनसेच्या स्थापनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या टोल प्लाझा आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालं होतं. या आंदोलनामुळे राज्य सरकारनं कॉन्ट्रॅक्ट संपलेले तब्बल 65 टोलनाके बंद केले होते. यापैकीच एका आंदोलनाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे यांना काही दिवसांपूर्वीच बेलापूर इथल्या न्यायालयात हजर राहावं लागलं होते. आता परत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील काही टोलनाके बंद व्हावे यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. आता पुन्हा या विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
स्थानिक नागरिकांचा येथील टोलवसुलीला तीव्र विरोध असून ताबडतोब ही टोलवसुली बंद करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याप्रसंगी राज ठाकरे यांनी आयआरबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसेकर यांच्याशी फोनवरून चर्चा करून उद्या या संदर्भातला अहवाल देण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, 21 फेब्रुवारीपर्यंत शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही तर मोठे आंदोलन सोमाटणे टोल प्लाझावर केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ
राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?
‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस
चिंताजनक! मुंबईतील ‘या’ भागांमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना
‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा