राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट रचतोय!

मुंबई | राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगल घडवण्याचा कट अाखण्यात येत आहे, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी  केला आहे. ते विक्रोळी मधील एका कार्यक्रमात बोलत होते. 

एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. राम मंदिराच्या मुद्यावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींच्या मदतीनं देशात दंगली घडवण्याचा कट आखला जात आहे, असं राज यांनी म्हटलं आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात मोठ्या दंगली घडवण्याचं कारस्थान रचण्यात येत आहे. हिंदू-मुस्लीम यांच्या दंगलींवरून हे लोक मत मागणार आहेत, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, देशातील हिंदू-मुस्लीम यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सतर्क रहा, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘मोदींना अक्कल दाढ आली नव्हती तेव्हा नेहरुंनी इस्त्राेची स्थापना केली’

-दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार