Top News

राम मंदिराचा निकाल ऐकायला आज बाळासाहेब असायला हवे होते- राज ठाकरे

मुंबई | राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यावर आजचा निकाल ऐकायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असायला हवे होते, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अतिशय आनंद झाला. शहीद कारसेवकांच्या बलिदानाला न्याय मिळणार का हा प्रश्न होता. पण आता निकाल लागल्यानंतर एवढ्या वर्षांचा प्रश्न निकाली लागला, असंही राज म्हणाले.

देशातील बहुसंख्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने आजचा निर्णय दिल्याने आज अतिशय आनंद झाला आहे. आता लवकरात लवकर राम मंदिर उभं रहावं पण त्याचबरोबर देशात रामराज्य देखील यायला हवं, असंही राज म्हणाले.

दरम्यान, आज निकाल ऐकून बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता. सुप्रीम कोर्टाला आज जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. आता फक्त राम मंदिर लवकरात लवकर उभं रहावं, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या