बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Raj Thackeray: “झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका”, राज ठाकरेंची मागणी

मुंबई | काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या वर्धापणदिनावेळी राज्यातील राजकारणावर भाष्य केलं होतं. त्यातच कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळावा होत आहे. राज ठाकरे यांनी बोलताना विरोधकांवर तोफ डागली आहे.

माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला, अडीच अडीच वर्षे ठरली होती हे सांगितलं नाही. दुसरा वेगळाच जोडा समोर आला. त्यानंतर लक्षात आलं ये शादी नहीं हो सकती, असा टोला राज ठाकरेंनी पहाटेच्या शपथ विधीवरून लगावला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील असा प्रकार बघितला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, व्यासपीठावर एकमेकांना शिव्या घालता आणि एकमेकांच्या मांडीवर बसता. हे तुमच झंगाड आहे त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार?, असा प्रश्न राज ठाकरेंनी केला आहे. दररोज कॅमेऱ्यावाल्यांसमोर बकबक सुरू, असा टोला त्यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

Raj Thackeray: “सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला

“बाप तो बाप असतो आणि नेता तो नेता, हे कोणी विसरता कामा नये”

Dhananjay Munde: त्यादिवशी विधानसभेत नक्की काय झालं?; अखेर धनंजय मुंडेंनी खुलासा केला

“अजितदादा तुम्ही जिथं आहात, तिथं मी यायची गरज नाही, आपण एकत्रच…”

Weather Alert: राज्यातील ‘या’ भागात जोरदार पाऊस कोसळणार; उकाड्यापासून सुटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More