मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्याला संबोधित करताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. 2019 नंतर राज्यात हे असले प्रकार चालू झाले आहेत.
राज्यात आणि खासकरून मुंबईत आज जे चालू आहे ते चिंताजनक आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर हे सर्वप्रकार चालू आहेत. मुंबईच्या रस्त्यावरून आज बेस्ट आणि इतर अनेक प्रश्न आहेत ज्यावरून आपल्याला हिंदू असण्याची लाज वाटायला पाहीजे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
आपण सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येण्याची गरज आहे. हिंदू म्हणून आपण सर्वजण कधी एकत्र होणार?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. राज ठाकरेंनी मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. परिणामी राज्यात परत एकदा हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची कास धरल्याने आता मनसे आगामी काळात भाजपसोबत युती करणार असल्याची शक्यता आहे. त्यावर आता भाजपने देखील साॅफ्ट भूमिका घेतल्याचं दिसतंय.
थोडक्यात बातम्या –
Raj Thackeray: “सकाळी पाहतो काय, तर जोडा वेगळाच”; पहाटेच्या शपथविधीवरून राज ठाकरेंचा टोला
“बाप तो बाप असतो आणि नेता तो नेता, हे कोणी विसरता कामा नये”
Dhananjay Munde: त्यादिवशी विधानसभेत नक्की काय झालं?; अखेर धनंजय मुंडेंनी खुलासा केला
“अजितदादा तुम्ही जिथं आहात, तिथं मी यायची गरज नाही, आपण एकत्रच…”
Comments are closed.