होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

होय, मी राज ठाकरेंची भेट घेतली… भेट घेण्यात गैर काय?- अजित पवार

मुंबई |  होय मी राज ठाकरेंची भेट घेतली…. असा स्पष्ट खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी रात्री उशिरा केला.

मनसे महाआघाडीत सामिल होणार अशा चर्चा रंगत होत्या. परंतू अजित पवार-राज ठाकरे भेटीने त्याच्यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय.

मनसे आहाआघाडीत असणार नाही, असं वक्तव्य करून यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतू समविचारी पक्षांनी सोबत असलं पाहिजे म्हणून मनसेने महाआघाडीने सामिल व्हावं, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे.

मुंबईत दोघांचेही (अजित-राज) यांचे स्नेही असलेल्या मित्राच्या घरी ही भेट झाल्याचं कळतंय. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चाही झाली. आज राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्यांची बैठक आहे. मनसे आघाडीत सामिल होणार का? की आगमी लोकसभा निवडणुकीत वेगळं लढणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदी हटाव देश बचाव; ममता बॅनर्जींचा नवा नारा

शरद पवार माढ्यातून निवडणूक लढवणार; बैठकीत शिक्कामोर्तब

अजित पवार आणि राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक समोर असताना मुंबईत भेट

मोदींना आता लाज झाकायला कपडाही शिल्लक नाही- शरद पवार

शिवसेनेपेक्षा मनसे चांगली; राज ठाकरेंबाबत काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

Google+ Linkedin