“छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात राज ठाकरेंचाही सहभाग”
औरंगाबाद | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पाडवा मेळावा घेत राज्यात मोठी चर्चा घडवून आणली. इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना ठाकरेंनी लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंवर जोरदार टीका होत आहे.
औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. जेम्स लेन आणि पुरंदरेंचा देखील त्यांनी उल्लेख केला आहे. जेम्स लेनला मदत करणारे पुरंदरे आणि त्यांना मदत करणारे राज ठाकरे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याच्या कटात सहभागी आहेत, असा आरोप कोकाटेंनी केला आहे.
राज ठाकरेंनी माफी मागावी अन्यथा राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही, असं कोकाटे म्हणाले आहेत. राज ठाकरेंचा हिंदूत्वाचा मुद्दा असेल तर असावा आमचा काही संबंध नाही. फक्त महाराजांचा अपमान करणाऱ्यांचे तुम्ही समर्थक कसं करता? हा आमचा सवाल आहे, असं कोकाटे म्हणाले आहेत.
दरम्यान, जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा अधिकार राज ठाकरेंना कुणी दिले, असा सवाल देखील कोकाटेंनी केला आहे. त्यामुळे आता राज्यात वाद वाढण्याची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
“…जरा तारतम्य ठेऊन बोलावं”, अजित पवारांनी मिटकरींना फटकारलं
मोठी बातमी! राणा दांपत्याला मुंबई पोलिसांचा झटका
“भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात”
“बंटी बबली मुंबईत पोहोचले तर पोहचू द्या, त्यांना अजून…”
‘भाजप इतका जूना पक्ष की…’; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची जयंत पाटलांनी उडवली खिल्ली
Comments are closed.