मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या व्यंगचित्रामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यातच आता हे व्यंगचित्र बाळासाहेबांच्या एका व्यंगचित्रासारखं असल्याचं समोर आलं आहे.
इंदिरा गांधी यांच्याविरोधात बाळासाहेबांनी हे व्यंगचित्र काढलं होतं. ते आता सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
21 सप्टेंबर 1980 च्या मार्मिकमध्ये हे व्यंगचित्र छापून आलं होतं. भारतमातेच्या गळ्याभोवती दोरखंड आवळल्याचं या व्यंगचित्रात दिसत आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रात प्रजासत्ताकच्या गळ्याभोवती फास आवळताना दाखवण्यात आलाय. मोदी-शहा जोडगोळी हा फास ओढत असल्याचं दाखवण्यात आलंय.
महत्वाच्या बातम्या-
-कुंभमेळ्यात डुबकी मारुन प्रियांका-राहुल भाजपसोबत दोन हात करणार!
-काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; राजू शेट्टीही आघाडीतून बाहेर पडणार?
-…म्हणून एका चहावाल्यालाही मोदी सरकारनं दिला पद्मश्री पुरस्कार!
–माजी खासदाराची नात आणि आमदार कन्येला युवक काँग्रेसनं केलं सरचिटणीस
-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपचं व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर