Mumbai News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी ही भेट पार पडली. या बैठकीला मनसेचे नेते बाळा नांदगावकर सुद्धा उपस्थित होते. येत्या काही काळातील दोघांमधली ही सहावी भेट आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्याच चर्चांना उधाण आलेलं आहे.
राज ठाकरेंच्या भेटीचं कारण काय?
राज ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटायला पोहोचल्यानंतर लगेचच या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. तूर्तास तरी ही भेट राज्याच्या विकासकामांबाबत असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील मराठी पाट्यांचा प्रश्न, टोलनाक्यांवरील वसुली, धारावी पुनर्विकास, मुंबई तसेच डोंबिवलीतील विविध विकासकामं या मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
याच महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच २ डिसेंबर रोजी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली होती. यावेळी त्यांनी दुकानावरील मराठी पाट्यांचा तसेच टोलनाक्यांवरील(Tollnaka) वसुलीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे मांडला होता, अशी माहिती आहे. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या काही मागण्या देखील मुख्यमंत्र्यापुढे ठेवल्या होत्या.
राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा-
दुसरीकडे राजकीय वर्तुळात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. 2024 ची लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) जवळ येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी लोकसभेची तयारी सुरु केलीय, अशात राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठका वाढल्या आहेत, त्यामुळे या भेटींमागे काहीतरी राजकीय गणितं शिजत असल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.
राज ठाकरे भाजप-शिवसेनेला साथ देणार-
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मूळ शिवसेनेवर(Shivsena) दावा केला आणि त्यांना मूळ शिवसेनेचा ताबा देखील मिळाला. भाजपसोबत (BJP) जाऊन त्यांना मुख्यमंत्रीपद देखील मिळालं, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वतःचा पक्ष नव्या नावाने पुढे चालवला आहे. आता अशा परिस्थितीत राज ठाकरे भाजपला साथ देणार का?, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपला आणखी साथीदार सोबत हवे आहेत, तर दुसरीकडे स्थापनेनंतर चांगली कामगिरी करणाऱ्या मात्र नंतर सातत्याने राजकीय गटांगळ्या खाणाऱ्या मनसेला मदतीचा हात गरजेचा आहे, अशा परिस्थितीत राज ठाकरे (Raj Thackeray) भाजपच्या वळचणीला जाणार का?, असा प्रश्न आहे. दरम्यान, शिवसेनेत असताना राज-एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले होते, त्यामुळे हेच संबंध वापरुन भाजप काही नवीन खेळी करत आहे का?, असाही प्रश्न विचारला जात आहे.
News Title: Raj Thackeray and eknath shinde meet
महत्त्वाच्या बातम्या-
Ajit Pawar | महायुतीत वादाची ठिणगी; भाजप-शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप
Salman Khan | ‘…म्हणून मी आजवर एकही किसिंग सीन दिला नाही’; अखेर सलमानने सांगितलं कारण
Aishwarya Rai च्या ‘या’ चित्रपटांनी लावलं जगाला वेड, एकदा तरी आवर्जुन पहायला हवेत असे चित्रपट!
Investment Tips | 25 व्या वर्षी ‘या’ 4 गोष्टी नक्की करा, भविष्यात कधीच भासणार नाही पैशांची कमी
JN1 Varient | वाढत्या कोरोनामुळे सरकार अलर्ट मोडवर; उचललं मोठं पाऊल!