मोठी बातमी! राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र, पाहा फोटो

मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईत एकत्र आल्याचं पाहायला मिळाले. यावेळी दोघं एकमेकांशी बोलतानाही दिसले.

राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाच्याचं आज लग्न होतं. या लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.

दोन्ही भावात काही वेळ एकमेकांशी संवाद साधल्याचे दिसले. यापूर्वीच्या सोहळ्यात आणि कार्यक्रमात दोन्ही बंधू एकत्र दिसले होते. पाच दिवसांपूर्वी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं होते.

राज-उद्धव बंधू कौटुंबिक सोहळ्याला हजर

ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे, अशी भावना सध्या मराठी जनतेची आहे. मनसे आणि ठाकरे गटाची विधानसभा निवडणूकीत वाताहात झाल्यानंतर आता राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावेत यासाठी सजामाध्यमांवर चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीत मनसेने राज्यात एकला चलो रे चा नारा दिला होता. तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवडणूक लढवली होती. निवडणुकीदरम्यान दोघांनी एकमेकांवर सडकून टीका केली होती. निवडणुकीदरम्यान घेतलेल्या टोकाच्या भूमिकेनंतर दोन्ही भावांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!

अखेर मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, इथे वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला!

खातेवाटपाआधीच मंत्री अडचणीत; फडणवीसांच्या वक्तव्याने धनंजय मुंडेंचं टेंशन वाढलं

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .