भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?

Raj Thackeray

Raj Thackeray l लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एनडीएला पाठिंबा दिला होता. राज ठाकरे हे महायुतीच्या मोर्चात देखील सहभागी झाले होते. तेव्हा विधानसभा निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करेल आणि जागावाटपात महत्त्व येईल, असे मानले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आणि जागा गमावल्या.

मनसेचे विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर :

मात्र आता राज ठाकरेंनी एकट्याने जाण्याची रणनीती आखली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) बाळा नांदगावकर यांना मुंबईच्या शिवडी विधानसभेतून तर दिलीप धोत्रे यांना पंढरपूरमधून उमेदवारी दिली आहे. राज ठाकरेंच्या या रणनीतीमुळे महायुती आणि महाआघाडीमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

याशिवाय राज ठाकरे अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या वरळीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. अशातच आता या मतदारसंघात संदिप देशपांडेंना संधी मिळणार असल्याची शक्यता आहे.

Raj Thackeray l राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य :

मनसे महाराष्ट्रात तब्बल 225 ते 250 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी 25 जुलै रोजी केली होती. युती कोणासोबत होणार आणि किती जागा मिळणार, या भ्रमात राहू नका, असे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले होते.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सत्तेत बसवण्यासाठी मला काहीही करावे लागेल, असे राज ठाकरे म्हणाले होते. लोक माझ्यावर हसतील, पण मला काही फरक पडणार नाही. पण ते होणार आहे. अशातच आता राज ठाकरेंनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे राज्यातील इतर पक्षांचं टेन्शन वाढलं आहे.

News Title : Raj Thackeray Announce MNS Candidate 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन

रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी; तब्बल ‘इतक्या’ पदांसाठी बंपर भरती

12 उपक्रमशील शिक्षकांना विनोबा पुरस्कार प्रदान!

केरळमधील भूस्खलनग्रस्तांसाठी साऊथ अभिनेत्याचा पुढाकार; दिले लाखोंचे योगदान

नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .