Raj Thackeray | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, रायगड, सातारा, सांगली या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे राज्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्याच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सिंहगड रोड परिसरात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी बोटीचा वापर करावा लागत आहे. त्याचपार्श्वभूमीवर मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
“माझी सर्वांना हात जोडून विनंती…”
वांद्रे येथील एका सभागृहात मनसेचा मेळावा आयोजित झाला. त्यावेळी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, जिथे पूर आला तिथं घरात पाणी साचलं, प्रत्येक घरात जाऊन मदत करा. पक्ष म्हणून तुम्ही लोकांना भेटा, त्यांना मदत करा, असं आवाहन राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं.
मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी निवडणुकीसाठी आपली रणनीती सांगितली. आपण आता जवळपास 250 जागांवर विधानसभेसाठी निवडणूक लढवणार आहोत. यामुळे युती होईल का? जागा मिळतील का? असा सवाल समोर आला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काहीही करून लोकं सत्तेत बसवायचे असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलं आहे.
“1 ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय”
निवडून येण्याची केपॅसिटी असलेले तयार असलेल्यांना तिकीट देणार आहेत. तिकीट मिळालं की पैसे मागायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही. तुम्ही मोठ्याने घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका. सर्व गोष्टी चेक करणार. त्यानंतर पावसापाण्याचा विचार करत 1 ऑगस्टपासून राज्याचा दौरा सुरू करतोय, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.
News Title – Raj Thackeray Appeal Activists Give Help For Maharashtra Floods Affected Area
महत्त्वाच्या बातम्या
पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video
पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..
“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल
“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, विधानसभा स्वबळावर लढणार”; राज ठाकरेंची मोठी घोषणा
पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…