‘ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी खुशाल जा पण नंतर…’, राज ठाकरेंची कार्यकर्त्यांना तंबी
मुंबई | अनेक घडामोंडींमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संवाद यात्रा आणि बैठकांना सुरूवात झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गुरूवारी मनसे नेत्यांची बैठक घेतली आहे.
राज ठाकरे यांनी नाशिकमधील अनेक मनसे नेत्यांची बैठक घेत त्यांना थेट इशारा दिला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंड करणाऱ्या अनेक नेत्यांना राज ठाकरेंनी तंबी दिली असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं. पण गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा, असा दम राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर अनेक जण नाराज होतात आणि बंड करतात. त्यापेक्षा आत्ताच जा. अचानक गेल्यापेक्षा आत्ता गेलात तर बरं होईल, असंही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. पुर्ण ताकदीने निवडणुकाला सामोरं जाण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे.
थोडक्यात बातम्या-
रशियाच्या आक्रमणाला तोंड देणारे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष स्वत: रणांगणात
‘त्यादिवशी अनेकांना तोंड दाखवण्याचीही जागा उरणार नाही’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
शिवसैनिकाची ऐनवेळी मास्कमुळे तारांबळ, व्हिडीओ तुफान व्हायरल
अमृता फडणवीसांचं ‘तांडव’, नवं गाणं होतंय तुफान व्हायरल
पंतप्रधान मोदींचा राष्ट्राध्यक्ष पुतीनला फोन, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला
Comments are closed.