मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना (Shinde-Fadnavis) सुनावलं आहे. प्रचंड ऊन असल्यानं सोहळा संध्याकाळी ठेवावा, हे प्रशासनाला कळलं नाही का?, असं राज ठाकरेंनी (Raj Thackeray) म्हटलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का?, असं राज ठाकरे म्हणालेत.
कधी नव्हे ते मुंबईतसुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- जिओच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज; कंपनीने आणला सर्वात स्वस्त प्लॅन
- ‘एक माणूसही भाडखाऊ नाही…’; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं
- ‘कुछ तो मजबुरीयाँ रही होंगी’; जंयत पाटलांचं अजित पवारांसमोर मोठं वक्तव्य
- “राहुल गांधींना महाराष्ट्रात येऊ न देणाऱ्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही”
- मुलगी कशी हवीये?; आदित्य ठाकरेंनी अखेर सांगितलं