बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; केली ‘ही’ मागणी

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचं कळतंय. एमपीएससीची पूर्व परीक्षा 11 एप्रिलला होणार आहे. मात्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र आता वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी  केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करुन वीकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करण्याचं आव्हान केलं होतं. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या चर्चेचा तपशील राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केला होता.

बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. तसेच राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. पण त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात आरोग्य आणीबाणी; ‘या’ तीन गोष्टींची मोठी कमतरता!

नगरच्या तरुणाची औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या, हाताविना आढळला मृतदेह

लस संपली! मुंबईतील सर्वात मोठं लसीकरण केंद्र पुरवठ्याअभावी बंद

‘त्या’ प्रकरणात माझीही चौकशी करा; अजित पवारांचं खुलं आव्हान

धक्कादायक! एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More