Top News

‘तू प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’; राज ठाकरे यांचा रुपाली पाटील यांना फोन

पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुपाली पाटील यांना फोन केल्याचं कळतंय.

‘तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो’, असं राज ठाकरे यांनी फोनवर रुपाली पाटील यांना सांगितलं. रुपाली पाटील यांना आलेल्या धमकीनंतर राज ठाकरे यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली.

राज ठाकरे यांच्या फोननंतर ज्यांच्या डोक्यावर राज ठाकरे यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. अश्या धमक्यांना मनसे वाले भीक सुद्धा घालत नाही , अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी दिली आहे.

धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी मी लढत राहीन, असं रुपाली पाटील म्हणाल्यात.

महत्वाच्या  बातम्या-

…तर मुंबई महापालिकेत आरपीआयचा उपमहापौर असेल- रामदास आठवले

‘विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर’; कपिल सिब्बलांचा काँग्रेसला पुन्हा एकदा घरचा आहेर

आपण विरोधक होतो हा इतिहास बुजवा, नवी नांदी निर्माण करा- उद्धव ठाकरे

ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निवडीबाबत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला…

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या