Top News विधानसभा निवडणूक 2019

मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका; राज ठाकरेंची जनतेला भावनिक साद

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दहीसर येथे प्रचारसभा झाली. यावेळी ठाकरे यांनी जनतेला भावनिक साद घातली आहे. मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका, या सरकारला उलथवून टाकण्याची आज गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्याची ‘हिच ती वेळ’. मनसेच्या प्रत्येक उमेदवारात आग आहे. सरकारच्या आरेला कारे करण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या भ्रष्टाचारी लोकांना भाजपने तिकिटं दिली, मग काय बदल झाला? काय बदल होणार आहे? हा बदल व्हायला हवा म्हणून येत्या 21 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. कारण माझ्या उमेदवाराच्या मनात सरकारविरोधात राग आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

विरोधक नसतील तर सत्ताधाऱ्यांच्या लहरीप्रमाणे काम होईल. आरेला कारे करणारे हवेत, सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एक कणखर विरोधीपक्ष हवा आहे. त्यामुळे मी जे तळमळीने सांगतोय ते ऐका, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या