बाळा… त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळीच्या निमित्ताने व्यंगचित्रांची एक सीरिज सुरु केली आहे. त्यात आता त्यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावर निशाणा साधला आहे. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची जागा दिल्यामुळे महापौरांचं निवासस्थान राणीच्या बागेत हलवण्यात आलं आहे. यावर हे व्यंगचित्र रेखाटण्यात आलं आहे. 

राज ठाकरेंनी महापौरांना एका पिंजऱ्यात दाखवलं आहे. राणीच्या बागेत आलेली एक आई आपल्या मुलाची समजूत घालत आहे. 

बाळा, त्यांना खायला घालू नकोस, अरे ते आपल्या मुंबईचे महापौर आहेत, असं ती आपल्या मुलाला म्हणत असल्याचं राज ठाकरे यांनी दाखवलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-मेनका गांधींच्या भावना मी समजू शकतो- मुख्यमंत्री

-…नाहीतर त्या नक्षलवादाचे नेतृत्व मी करेन- उदयनराजे भोसले

-काँग्रेसच्या महिला सचिवांना गँगरेपची धमकी; भाजप नेत्यांवर आरोप

-काय चौकशी करायची ती करा; अजित पवारांचं दानवेंना प्रत्युत्तर

-पंतप्रधान नरेंद्र मोदींंची यंदाची दिवाळी केदारनाथला

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या