मोदींच्या सिंहासनाला तडा; राज ठाकरेंचा वर्मावर वार

मुंबई | 5 राज्याच्या निकालांमध्ये भाजपची धूळधाण झाली आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्र काढलं आहे. 

मोदींच्या सत्तेच्या साम्राज्याला तडा गेला आहे, असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. हा तडा कधीही भरुन न निघणारा असल्याचं या व्यंगचित्रात म्हटलं आहे. 

मोदी एका खुर्चीवर बसले असून त्याच खुर्चीखाली हा तडा गेला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा त्यांच्या पाठीशी उभे असून दोघांच्या चेहऱ्यावरील भय या व्यंगचित्रात स्पष्ट दिसत आहे. 

दरम्यान, राहुल गांधी आता पप्पू राहिले नाहीत तर परमपूज्य झाले आहेत, असं कालच राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. 

महत्वाच्या बातम्या 

-जिओच्या साम्राज्याला धक्का?; गुगलचा स्वस्तातला फोन बाजारात दाखल

-नरेंद्र मोदींनी युवकांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत – राहुल गांधी

-RBI च्या नव्या गव्हर्नरनी केलं होत नरेंद्र मोदींच्या या सर्वात मोठ्या निर्णयाचं समर्थन

-कोण आहेत शक्तिकांत दास?

-मोदी सरकारचा उलटा प्रवास सुरु – अरविंद केजरीवाल