गांधी जयंतीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंकडून मोदी-शहांना शालजोडीतून टोले

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गांधी जयंतीचं औचित्य साधून एक व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. 

गांधीजी सूत कताई करुन कापड तयार करायचे मात्र मोदी जनतेच्या कापडापासून सूत तयार करत आहेत, असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलं आहे. शहांना त्यांची मदत करताना दाखवण्यात आलं आहे. 

मोदी सरकारच्या राज्यात सगळा उफराटा कारभार सुरु आहे. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या गर्तेत ढकलून नागवलं जात आहे, असं राज ठाकरेंना दाखवायचं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात-शरद पवार

-जिल्ह्याचा विकास करण्यासाठी बारामतीच्या नेत्याची गरज नाही- पंकजा मुंडे

-संभाजी भिडेंना महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा!

-शिवसेना नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल!

-मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलवले!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या