थंडीतील एक उबदार स्वप्न!, राज ठाकरेंचा भागवतांवर निशाणा

थंडीतील एक उबदार स्वप्न!, राज ठाकरेंचा भागवतांवर निशाणा

मुंबई | मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आता सरसंघचालक मोहन भागवत यांना निशाण्यावर घेतलं आहे. भागवत यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढलं असून ते आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केलंय. 

व्यंगचित्रात सरसंघचालक मोहन भागवत झोपलेले दाखवण्यात आले आहेत. त्यांना स्वप्न पडतंय असं दाखवण्यात आलंय.  राज ठाकरे यांनी या स्वप्नाला ‘थंडीतील एक उबदार स्वप्न!’ असे नाव दिले आहे. 

‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तस संघ स्वयंसेवक 3 दिवसात तयार होतील, असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं.

Google+ Linkedin