Top News महाराष्ट्र मुंबई

‘ती’ व्यक्ती पवारांना भेटल्यानंतर वीजबिल माफीचा निर्णय मागे; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई | लॉकडाऊनमध्ये आलेल्या ज्यादाच्या वीजबिलावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते.

सरकारमधील वीज मंत्री आधी वीज बिल कमी करु असं म्हटले. मात्र अदानी शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतंही वीजबिल माफ करणार नाही अशी भूमिका घेतली असल्याचं राज ठाकरे म्हणाले.

वीज कंपनीला फायदा झाला नाही म्हणून सरकार जनतेला पिळणार असेल तर कसं होईल?, मी जेव्हा राज्यापालांना भेटायला गेलो तेव्हानी शरद पवारांशी बोलून घेण्यास सांगितलं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.

दरम्यान, पवार म्हणाले त्या वीज कंपन्यांच्या नावाने मला पत्र लिहू पाठवा. मग संबंधित कंपन्यांमध्ये अदानी, एसएमबी किंवा टाटा असेल त्यांच्याशी पवार बोलणार होते. मात्र नंतर 5 ते 6 दिवसांनी मला समजलं की  अदानी शरद पवार यांच्या घरी येऊन गेलेत. तेव्हा त्यांच्यात काय चर्चा झाली माहित नाही मात्र नंतर सरकारने वीजबिल माफ करणार नाही असं उत्तर आलं त्यामुळे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणं गरजेचं असल्याचं ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

सचिन तेंडुलकरचा फोटो जाळणं हा राष्ट्रद्रोह- नारायण राणे

नवरदेवाच्या वागण्यानं स्टेजवर एकच गोंधळ; नवरीही झाली आऊट ऑफ कंट्रोल, पाहा व्हिडीओ

“भरणे मामा मंत्री झाले, मी मंत्री झालो… आम्ही कधी जॅकेट घातलं का?”, या नेत्याला अजितदादांचा टोला

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; पाहा काय आहे प्रकरण…

अमित शहांच्या पायगुणाने राज्य सरकार जावं- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या