Loading...

उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला मंदी म्हणायचं नाही का?; राज यांची रविशंकरांवर टीका

यवतमाळ | कायदामंत्री रविशंकर प्रसाद म्हणतात ‘हिंदी चित्रपट कोट्यवधी रु. कमावतात म्हणजे मंदी नाही.’ मग देशातले सर्व उद्योगधंदे बंद होत आहेत, ह्याला काय म्हणतात? हजारो तरुण बेरोजगार होत आहेत, ह्याला काय म्हणतात?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सरकार फक्त लोकांची दिशाभूल करत आहे. हे सरकार महाराष्ट्राला मागे नेत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Loading...

शेतकऱ्यांना खुली बाजारपेठ, पीकविमा, फुल-फळ शेती ह्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणार, असं 5 वर्षांपूर्वी भाजप-शिवसेना सरकारने आश्वासनं दिली होती. काय झालं त्या आश्वासनांचं?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा होणार आहे. मागिल पुण्यातीस सभेवर पावसानं पाणी फेरले होते आणि आजही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याने राज यांच्या सभेकडे लक्ष लागलं आहे.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या-

 

Loading...

 

Loading...