मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ गेल्या 3 दिवसांपासून चांगलीच धडाडते आहे. आज मुंबईच्या दहिसरमध्ये बोलताना त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केलं. त्यांच्या ‘हीच ती वेळ’ या टॅगलाईनवर राज यांनी टीकेचा बाण सोडला. 5 वर्षे वेळ नव्हती का? असा सवाल त्यांनी विचारला.
सत्तेत असताना शिवसेनेने काही केलं नाही. आणि आता म्हणतायेत हीच ती वेळ, असं म्हणत त्यांनी शिवसेनेचा जोरदार समाचार घेतला.
आरेतलं जंगल रातोरात तोडलं. लोकांनी आक्रोश केला पण ह्यावर उद्धव ठाकरे झाडं तोडल्यावर म्हणतात की सत्तेत आल्यावर आरेला जंगल म्हणून घोषित करू. आता काय तिकडे गवत लावणार का? मनाला वाटेल तसं काहीही बोलतात, अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं.
शिवसेना-भाजपच्या जाहिराती पहा, सगळीकडे लिहिलंय ‘हीच ती वेळ’ म्हणजे गेली 5 वर्ष नव्हता का ह्यांना वेळ? ह्या नेत्यांच्या आर्थिक हितसंबंधांची फक्त राजीनाम्याच्या धमक्या दिल्या गेल्या, अशी टीकाही राज यांनी केली.
महत्वाच्या बातम्या-
दादा-भाई लोकांनो सावधान; मोस्ट वॉंन्टेड गुंडाची पोलिसांनी काढली धिंड https://t.co/QqMbw3xMxK
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं- सदाभाऊ खोत https://t.co/J8TxDNMBD2 @Sadabhau_khot @PawarSpeaks
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
किती खावं याची काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांनो जरा लाज धरा- उद्धव ठाकरे – https://t.co/eDobit2oCB @uddhavthackeray @NCPspeaks @INCIndia
— थोडक्यात (@thodkyaat) October 13, 2019
Comments are closed.