आजपर्यंतच्या इतिहासात मोदी हे सर्वात जास्त निर्लज्ज पंतप्रधान- राज ठाकरे

सोलापुर |  नरेंद्र मोदी-अमित शहांनी देश लुटला आहे. हीच वेळ आहे त्यांना लुटायची. हे सत्तेत आले तर देशात गळचेपी सूरु होईल. आजपर्यंतच्या इतिहासात मोदी हे सर्वात जास्त निर्लज्ज पंतप्रधान आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

मोदी आणि शहा या जोडीला देशाच्या राजकीय पटलावरून आपल्याला नाहीशी करायची आहेत. यांनी देशाचं वाटोळं केलंय, असा हल्लाहोल राज यांनी सोलापुरच्या सभेत बोलताना केला.

शहिदांच्या नावाने नरेंद्र मोदींना मते मागताना लाज कशी वाटत नाही. नवाज शरीफना लव्ह लेटर पाठवू नका असं २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बोलणारे मोदी… पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफना शपथविधीला बोलावू लागले… काय वाटलं असेल शहीद जवानांच्या कुटुंबियांना? असं राज म्हणाले.

दरम्यान, राज यांनी सोलापुरच्या सभेत भाजपची पोलखोल करत मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-“भाजपवाले पैसे वाटतील… यांनी देश लुटलाय… आता वेळ आलीय यांना लुटायची”

-राज ठाकरेंनी भर सभेत भाजपच्या स्वंयघोषित विकासचा बुरखा फाडला!

-“काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?”

-“आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना रोजगार द्या; आपल्याला आरक्षणाची गरजच नाही”

-आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा- राज ठाकरे