“शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार..”; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मागे शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. यावरच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केलं आहे.तसेच मराठा-ओबीसी आरक्षणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरे यांना महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती पवारांनी व्यक्त केलीये, त्यावर तुम्हाला काय वाटते?, असा सवाल केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, “शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. पण, त्यांचं आतापर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही.”, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

पुढे राज ठाकरे यांनी आरक्षण प्रश्नी देखील भाष्य केलं. “हे सगळं काही मतांचं राजकारण आहे. ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे.”, असं राज ठाकरे म्हणाले.

“..हा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग”

“आता हा वाद शाळा-कॉलेजपर्यंत पोहोचला आहे. हे चित्र भीषण आहे. असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडलाय. असं राजकारण करणाऱ्याला समाजाने निवडणुकीच्या वेळी दूर ठेवलं पाहिजे.”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

“केंद्र सरकार हे अनेक ठिकाणी खासगीकरण करत आहे. खासगी शिक्षणसंस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का?, यातून किती नोकऱ्या उपलब्ध होतील?, त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजेत. हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे”, अशी टीका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली आहे.

News Title :  Raj Thackeray criticizes Sharad Pawar

महत्त्वाच्या बातम्या-

12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार

“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

राज्यातील 20 धरणे तुडुंब भरली; ‘या’ गावांना सावधानतेचा इशारा

रोज सकाळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे!

पुणेकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढला, खडकवासलातून पाण्याचा ‘विसर्ग’ वाढवणार