महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

सर्वसामान्यांचे पैसे कोणाच्या खिशात गेले?- राज ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वसामान्यांचा आयुष्यभराचा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये राज ठाकरे यांनी सभांमधून भाजप- शिवसेनेला अनेक निर्णयांवरून धारेवर धरलं. बँकांतील घोटाळे, बुलेट ट्रेन, 370 कलमांचा भावनिक मुद्दा, वेगळ्या विदर्भाचे राजकारण आणि मुंबईच्या अस्तित्वाचा प्रश्न, अशा मुद्द्यांवरून भाजप-शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजप हे 370 कलम, पुलावामा हल्ला अशा भावनिक मुद्दय़ांवर भाजप प्रचार करत आहे. कामाच्या आधारावर नाही तर भावनेच्या आधारावर मतदान केलं जातं, अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आरेमधील झाडे तोडण्याच्या मुद्दय़ावरून त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. आमचे सरकार आल्यावर आम्ही तेथे जंगल घोषित करू, असं शिवसेना पक्षप्रमुख म्हणतात. मग काय तेथे गवत लावणार का, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या