Top News महाराष्ट्र मुंबई

राज ठाकरे, फडणवीसांनी वीजबिले भरली, पण जनतेला सांगता वीजबिले भरु नका- नितीन राऊत

मुंबई  | राज्यात सध्या कोरोना काळात आलेल्या वाढीव वीजबिलावरुन नागरिकांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे . याच पार्श्वभूमीवर मनसे आणि भाजप राज्यभर आंदोलने करत आहेत. यावरुन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

‘आंदोलन करणाऱ्या राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना आलेली विजबिलं भरली आहेत, पण जनतेला सांगतात बिले भरु नका हा कुठला न्याय आहे?’, असा सवाल नितीन राऊत यांनी विरोधकांना केला आहे.

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. केंद्राने राज्यांच्या हक्काचा पैसा दिलेला नाही, असं राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असताना सांगितले.

तसेच राज्याने सगळी तिजोरी कोरोनाकडे वळवली आहे. वीजबिलमाफीसाठी राज्यसरकारमध्ये कुणी अडचण आणण्याचा प्रश्न नाही. प्रश्न राज्याच्या अर्थव्यवस्थेचा असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकर

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या