मनसेच्या कार्यक्रमावेळी लाईट घालवली तर अधिकाऱ्यांना तुडवा!

संग्रहीत फोटो

मुंबई | मनसेच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावेळी लाईट घालवली तर तिथल्या अधिकाऱ्यांना तुडवा, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. मनसेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कावर राज ठाकरे यांची मुलाखत होणार आहे. मात्र याआधीचे सभेवेळी लाईट घालवण्याचे प्रकार लक्षात घेता आधीच जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना समजावून सांगा, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मनसेनेही आता मिस कॉल देऊन सदस्य नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. राज ठाकरे यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच मला जे काही बोलायचं आहे ते मी गुढीपाडव्याच्या दिवशी बोलेन, असं ते म्हणाले.