बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरेंनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही”

नाशिक | मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मुसळाधार पाऊसामुळे लाखो हेक्टर जमिनीचं नुकसान झाल्याचं पहायला मिळतंय. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

घरादारांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. ही आणीबाणीची वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तातडीने 50 हजारांची मदत जाहीर करावी आणि प्रत्यक्षात देखील तात्काळ मदत पुरवावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्राद्वारे केली होती. त्यावर, राज ठाकरे यांनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

राज ठाकरे यांनी मागणी केलीय हे मान्य आहे. पण त्यांनी मागणी करून काही मोठं काम केलं नाही. त्यामुळे राजकारण करू नका, असा सल्ला देखील गुलाबराब पाटील यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. मागणी करणं सोपं आहे, पण अंतिम निर्णय हा पंचनाम्यानंतरच घेतला जाईल, असंही पाटलांनी यावेळी सांगितलं आहे.

दरम्यान, मराठवाड्यात आणि राज्यातील इतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेती कंबरेपर्यंत पाण्याखाली गेल्याचं भीषण चित्र समोर येत आहे.

थोडक्यात बातम्या-

मद्यप्रेमींचा हिरमुड! ‘या’ ठिकाणी तब्बल 45 दिवस दारूची दुकानं बंद राहणार

शिवलीला पाटील बिग बॅासमधून बाहेर, समोर आलं ‘हे’ धक्कादायक कारण

“आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, संपूर्ण माहिती मिळताच तातडीने मदत करणार”

“उगाच मला डिवचू नका, मी केंद्रातलं सरकार पाडलंय”

आंदोलन भोवलं! काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More