बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-मनसे युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

नाशिक | आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आले असातनाच चंद्रकांत पाटील हे सुद्धा नाशिक दौऱ्यावर पोहोचले आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशात भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीवर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

मनसे परप्रांतियांच्या बद्दलची भूमिका बदलत नाही तो पर्यंत हे शक्य नाही. राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेले नेतृत्व आहे. मात्र, एकट्या मनसेच्या जिवावर सत्ता येणार नाही. आमचा खूप जुना परिचय आहे. योग आला, तर त्यांना भेटेल. ठाकरे आमच्यापासून दूर गेलेले नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना ईडीने अनिल देशमुखांवर केलेल्या कारवाईवर देखील भाष्य केलं. ईडी ही एक केंद्राची स्वायत्त संस्था आहे. मी त्याच्याबद्दल टिप्पणी करणार नाही. चौकशांना घाबरण्याचं कारण नाही. राष्ट्रवादीच्या बाबतीतचं नाही, तर आम्ही अन्यायच्या विरोधात आक्रमक आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, शिवसेने बरोबर आम्ही सत्तेत नाही, पण त्यांच्यासोबत आमचं वैर नाही. आम्ही लोकहिताचे आंदोलन करतो. तुम्ही एकत्र निवडणूक लढवता, मुख्यमंत्री पदासाठी वेगळं सरकार चालतं, वेगळ्या विचाराचं सरकार चालतं. परिस्थितीप्रमाणे निर्णय बदलत असतात, असंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

‘झोटिंग कमिशनचा अहवाल सरकारपर्यंत आलाच नाही’; अजित पवारांचा मोठा खुलासा

सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरचे राजकीय बाप, ते सांगतील तो सल्ला ऐकण्यास तयार- सुभाष देशमुख

…त्यामुळे शरद पवारांना बळीचा बकरा बनवू नका- रामदास आठवले

“मोदींच्या सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले, कलियुग म्हणतात ते हेच का?”

“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार, पुन्हा भाजपचा मुख्यमंत्री होणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More