बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरे हे मराठी ओवैसी, ते फक्त हिंदूंना भडकवतात”

मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरेंनी राज्यात परत एकदा हिंदूत्वाच्या मुद्दयावर राजकारण रंगवलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जातीवादी राजकारण करतात असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंची तुलना ओवैसी यांच्याशी करण्यात आली आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे ओवैसी आहेत. ते ओवैसी मुस्लीम समाजाला भडकवण्याचं काम करतात. तर हे ओवैसी हिंदू समाजाला भडकवण्याचं काम करतात. दोघांचीही मातृसंस्था एकच आहे, अशी जहरी टीका राष्ट्रवादी प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केली आहे.

महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ अशा मुळ मुद्द्यांना बगल देऊन राज ठाकरेंनी आता हिंदूंची माथी भडकवण्याचं काम केलं आहे, असं चव्हाण म्हणाले आहेत. राज ठाकरे हे हिंदू असतील तर हनुमान चालीसा न बघता म्हणून दाखवावी, असं आव्हान देखील चव्हाण यांनी राज ठाकरेंना दिलं आहे.

दरम्यान, सुरज चव्हाण यांनी राज ठाकरे भाजपच्या आदेशावर बोलत असल्याची अप्रत्यक्ष टीका केल्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांना राज्यात जातीवाद वाढवण्यास जबाबदार धरल्यानं राष्ट्रवादीकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! जयश्री पाटलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू

दोघात तिसरी! लग्नात नवरदेव मैत्रिणीला बोलत बसला अन् नवरीनं केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ

हार्दिकनं केल्या दांड्या गुल! सामन्यात असं काही केलं की…लाखोंचं नुकसान झालं

गायिका आशा भोसलेंचा मुलगा दवाखान्यात दाखल; प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

“…तर कारवाई केली जाईल”; रुपाली ठोंबरेंची थेट राज ठाकरेंवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More