Top News

राज ठाकरे ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये; बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई | मुंबईतील पहिल्या महाअधिवेशनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी सोमवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात ही बैठक होणार आहे.

मनसेकडून 9 फेब्रुवारीला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांच्या समर्थनार्थ मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाचं नियोजन करण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली असल्याचं सांगितलं जात आहे.

महाअधिवेशनात राज ठाकरेंनी सीएए आणि एनआरसीबाबत भूमिका स्पष्ट केली होती. घुसखोर बांगलादेशींना बाहेर हाकलून दिले पाहिजे, हिच आमची भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच एनआरसी आणि सीएएच्या समर्थनात मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

दरम्यान, 23 जानेवारीला मनसेचं पहिलं महिअधिवेश पार पडलं. यावेळी राज्य ठाकरे यांनी आपली बदललेली भूमिका महाराष्ट्राच्या जनतसमोर मांडली. तसेच त्यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले होते.

ट्रेंडिंग बातम्या-

महत्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या