Top News औरंगाबाद महाराष्ट्र

माझा ‘हिंदुहृदयसम्राट’ किंवा ‘हिंदुजननायक’ असा उल्लेख करु नका- राज ठाकरे

औरंगाबाद | माझा हिंदुहृदयसम्राट किंवा हिंदुजननायक असा उल्लेख करु नका, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत, त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

शहरात ‘हिंदुजननायक’ अशी होर्डिंग्स लागली असली तरी हा उल्लेख एका वृत्तवाहिनीने महामोर्च्याच्या वेळी केला होता हे लक्षात घ्या आणि काही दिवसांपूर्वी माझा उल्लेख ‘हिंदुहृदयसम्राट’ असा काही सहकाऱ्यांनी केला ज्यावर मी दुसऱ्याच दिवशी सांगितलं की असा उल्लेख करू नका, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्राचा इतिहास आहे की राजकीय भूमिकांवर जरी मतभेद असले तरी त्याचं रूपांतर व्यक्तिगत हेव्यादाव्यांमध्ये होत नाही; मध्यंतरी मी शरद पवारांना भेटलो ते ईव्हीएमच्या संबंधी. पण आपल्याकडे कोणी कोणाला भेटलं की लगेच राजकीय मैत्री सुरु झाल्याच्या बातम्या सुरु होतात, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास शेवटपर्यंत व्हायला हवा तो मध्येच थांबू नये इतकंच. बाकी तो कुठल्या यंत्रणांकडून होतोय ह्या पेक्षा तो नीट व्हायला हवा इतकाच माझा मुद्दा आहे, असं म्हणत राज यांनी भीमा कोरेगाव प्रकरणावरही भाष्य केलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है- रूपाली चाकणकर

विद्यार्थिनींनी घेतली प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ; पंकजा मुंडे संतापल्या

महत्वाच्या बातम्या-

क्रिकेट हा खेळ ‘जेंटलमेन्स गेम’ राहीला नाही- कपील देव

मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वखर्चाने उभारणार शिवाजी महाराजांचा पुतळा

भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहतीये भिंत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या