राज ठाकरेंनी भर सभेत भाजपच्या स्वयंघोषित विकासचा बुरखा फाडला!

सोलापुर |  हरीलसालच्या डिजिटल गावाचं वास्तव मनसेने समोर आणले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालंच आहे असा दावा TV 9 च्या कार्यक्रमात बोलताना केला. पण राज ठाकरेंनी आज सोलापुरच्या सभेत भाजपच्या स्वयंघोषित विकासाचा बुरखा फाडला.

TV9 मराठीने हरिसालवर रिपोर्ताज केला आणि भाजपचे खोटे दावे हाणून पाडले. याआधी राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात आणि नांदेडच्या सभेत हरिसाल मॉडेल कसं खोटं आहे? हे सांगितलं होतं.

डिजिटल गावात ४ जी टॉवर नाही. एटीएम मशीन बंद आहे. जाहिरातीतील लाभार्थी मॉडेल रोजगाराच्या शोधात गाव सोडून निघून गेला आहे आणि त्याच लाभार्थी मॉडेलला राज ठाकरेंनी सभेच्या व्यासपीठावर आणून भाजपची आणखी डोकेदुखी वाढवली.

दरम्यान, राज ठाकरेंचं आजचं सोलापुरचे भाषण भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवणार, असं दिसतंय.

महत्त्वाच्या बातम्या

-“काय झालं मेक इन इंडियाचं? कोणाला कामं मिळाली? काय झालं स्टार्ट अप इंडियाचं?”

-“आमच्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना रोजगार द्या; आपल्याला आरक्षणाची गरजच नाही”

-आमच्या सभांचा खर्च मोजण्यापेक्षा तुम्ही थापा किती मारल्या हे मोजा- राज ठाकरे

-भाजपला मतदान करा; मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो- नितीन गडकरी

-‘जिवंतपणी कधी तुम्ही विचारपूसही केली नाही’; पर्रिकरांच्या मुलानं पवारांना पत्र लिहून व्यक्त केला संताप