बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज ठाकरे हे मला आवडणारं राजकीय व्यक्तिमत्त्व, लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार”

पुणे| आगामी मुंबई महापालिका निवडणूकांचं बिगूल वाजताना दिसत आहे. त्याच बरोबर मुंबईत राजकीय वारे फिरायला सुरूवात झाली आहे. सर्वच पक्ष राजकीय शक्तीप्रदर्शन करण्यास तयार दिसत आहेत. दावे प्रतीदावे सुरु असताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत देिले आहेत. त्यातच आता मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व आहे. ते बरं बोलत नाही तर खरं बोलतात. त्यांनी मला क्लिप पाठवली. ती मी ऐकली. येत्या एक दोन दिवसात राज ठाकरे यांची भेट होणार आहे. तेव्हा मी माझ्या मनातले प्रश्न मांडणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ‘मुझे आम से मतलब है, किससे मीली क्या मतलब’, असं सुचक वक्तव्य देखील त्यांनी केलं आहे.

मनसेसोबत युतीचा निर्णय मी एकटा घेणार नाही. आमचा पक्ष यासंदर्भात निर्णय घेईल. मनसेसोबत युती ऑन द स्पाॅट होणार नाही. या युतीमुळे देशाच्या राजकारणावर परिणाम होणार आहे. त्यामुळे मनसेसोबत युती करण्याआधी केंद्राची परवानगी घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, मनसेकडून परप्रांतियांना होणारा विरोध ही युतीतील अडचण आहे. ही अडचण दूर झाली तर मी त्यांना होकार देणार असल्याचं पाटलांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून भाजप मनसेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी टाळी देऊ शकते. तर मुंबई महापालिकेत जर युती झाली तर, पुणे आणि नाशिकमध्ये देखील मनसे भाजप युती होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! ऑनलाईन क्लास सुरू असताना मध्येच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ अन्…

मला खोटं बोलता येत नाही, जे करायचंय ते केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

‘मंडपात एंट्री घेताच नवरीने केलं असं काही की…’; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

संजय राठोडांशी ‘ती’ तब्बल 90 मिनिटे बोलली; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

कुणाला एवढी खूमखूमी आली असेल तर समोर या, स्वत:च्या पायावर याल पण…- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More