“राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, ते कोणाचे…”, चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं तोंडभरून कौतूक
मुंबई | मनसे प्रमुख राज ठाकरे राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. पाडवा मेळाव्यातील भाषणादरम्यान ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भाजपची बी टीम म्हणून देखील टीका झाली. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र आहे, ते कोणाची बी टीम म्हणून काम करणारे नाहीत, असं पाटील म्हणाले आहेत. मनसेला इको सिस्टीमनं भाजपची बी टीम बनवण्याचा प्रयत्न झाला असं देखील पाटील म्हणाले आहेत. पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात चर्चांना उधाण आलं आहे.
हिंदूत्व हा भाजपचा श्वास आहे, खूप आधीपासून आम्ही हा हिंदूत्त्वाचा मुद्दा मांडत आलो आहोत. काही जण आता हिंदूत्वाचा मुद्दा मांडत आहेत, अशी टीका पाटील यांनी केली आहे. राज्य सरकार सध्या सत्तेचा दुरूपयोग करत आहे, अशी टीका पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेत तलवार दाखवली होती. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
थोडक्यात बातम्या –
रशियाकडून होणाऱ्या हल्ल्यानंतर युक्रेनियन नौसैनिकांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
पुढचे दोन दिवस महत्त्वाचे, ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता
मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल
“राजसाहेबांचं आजचं भाषण बाळासाहेबांची आठवण करून देणारं”
‘काळजी घे, दगदग करू नको’; पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट
Comments are closed.