पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक हिंदुत्वाचा पवित्रा घेत मशिदींवरील भोंग्यांविरोधात तीव्र भूमिका मांडली. राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना राज ठाकरेंनी त्यांचा अयोध्या दौरा जाहीर करत चांगलीच खळबळ उडवून दिली.
राज ठाकरे 5 जून रोजी पक्षातील नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार असल्याची महत्ताची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेकडून पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज देखील करण्यात आला आहे.
राज ठाकरे उद्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर जाणार असून मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार 21 मे किंवा 29 मे या दोन तारखांपैकी एका दिवशी राज ठाकरेंची पुण्यात (Pune) सभा होऊ शकते.
दरम्यान, राज ठाकरेंच्या आणि मनसेच्या (MNS) दृष्टीने अयोध्या दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात सभा घेणार असल्याने सर्वांच्या नजरा पुण्यातील सभेकडे लागल्या आहेत. राज्यातील एकंदर घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यातील सभेत काय भूमिका मांडणार?, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर आधी…’; फारूख अब्दुलांच्या वक्तव्याने खळबळ
“फक्त वाघाचे छायाचित्र काढून वाघ होता येत नाही, त्यासाठी…”
राष्ट्रवादीविरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार; अजित पवार म्हणतात…
काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?, नाना पटोले स्पष्टच बोलले
हार्ट अटॅक येण्याआधी दिसतात ‘ही’ लक्षणं; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर
Comments are closed.