मी विनंती करतो बेसावध राहू नका, मोदी-शहा तुमचं जगणं हराम करतील- राज ठाकरे

सातारा | मी तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शहा तुमचं जगणं हराम करतील, असं राज ठाकरेंनी उपस्थितांना आवाहन केलं. राज ठाकरे कालची कोल्हापुरची सभा आटपून आज साताऱ्यात सभा घेत आहेत.

पाच वर्षात यांनी जे जे केलं नाही, ते ते जनतेसमोर मी आणणार म्हणजे आणणारच, असा निर्धार राज यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केला.

नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाही. त्यांना प्रश्न विचारणारी लोकं नको आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.

मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता… ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्राचा होता… मग मोदी आणि शहांच्या विरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?.. असं म्हणत शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय, असं राज म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे

-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!

-पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

-‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस