शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय- राज ठाकरे

सातारा |  मंगळवारच्या कोल्हापुरातल्या जाहीर सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे साताऱ्यात सभा घेत आहेत. मोदी शहांना राजकीय क्षितीजावरून हद्दपार करण्यासाठी मी सभा घेतोय, असा पुनरूच्चार राज यांनी केला.

मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता… ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्राचा होता… मग मोदी आणि शहांच्या विरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?.. असं म्हणत शिवाजी राजांची प्रेरणा घेऊन मोदी शहांविरूद्ध लढायला उभा राहिलोय, असं राज म्हणाले.

मोदी शहांनी देशाचे वाटोळे केलं. तुम्हाला दाखवलेल्या स्वप्नांबद्दल हे दोघे एक अवाक्षरसुद्धा काढत नाही, असा घणाघात त्यांनी मोदी-शहांवर केला.

थापा मारणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी क्लिप्स दाखवायला लागतात, असंही राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

-थोड्याच वेळात राज ठाकरे म्हणणार… ऐ लाव रे तो व्हीडिओ!

-पुण्यात काँग्रेस बॅकफूटवर?; अद्याप एकाही बड्या नेत्याची सभा नाही

-‘हिंदू दहशतवाद’ शब्दावरून सुशीलकुमार शिंदेंनी देशाची माफी मागावी- विनोद तावडे

सुजयला आपल्याला ‘वॉटरमॅन’ म्हणून ओळख द्यायची आहे- देवेंद्र फडणवीस

…तेव्हापासून विनोद तावडेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; मनसेची तावडेंवर जहरी टीका