बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाका”

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लावले आहेत, याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला, यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत तसेच काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये त्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांसंदर्भात देखील एक महत्त्वाची मागणी केली आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी ही मागणी केली. याआधी सरकारने पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणं कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज ठाकरे यांनी त्यामुळेच या मुद्द्याला हात घातल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता ठाकरे सरकार राज ठाकरे यांची ही मागणी विचारात घेऊन दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणार का?, असा प्रश्न आहे.

दरम्यान, पुन्हा पुन्हा लॉकडाऊन करणं चांगलं नाही. सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करावा. व्यापाऱ्यांना दोन तीन दिवस दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी द्यावी. नागरिकांना वीजबिल माफी द्यावी. कर्जवसुलीसंदर्भात सरकारने बँकांशी बोलावं. शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. लसीकरणासाठी वयाचं बंधन नसावं, अशा काही महत्त्वाच्या मागण्या राज ठाकरेंनी सरकारकडे केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“इतकंही वाहून जाऊ नका की, शरद पवार माझ्या वडिलांसारखे आहेत म्हणण्याची वेळ येईल”

मोठी बातमी! राष्ट्रपतींकडून न्यायाधीश एन. व्ही. रामन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; CBI टीम आज मुंबईत येणार

‘राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कळवण्यात येते की…’; शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ आदेश

“महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणामुळे मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला”- संजय राठोड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More