मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी मास्क न घातल्यानं सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना याबाबत विचारण्यात आल्यावर त्यांनी त्यांच्या स्वत:च्या शैलीत खास उत्तर दिलं. इतरांनी मास्क घातलं होतं, त्यामुळे मी मास्क घातलं नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, या बैठकीत परप्रांतीय कामगारांची परत तपासणी केल्यशिवाय त्यांना महाराष्ट्रात परत घेऊ नये, राज्य स्थलांतरित कायद्याखाली त्यांची नोंदणी करावी तसेच जे कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत त्यांच्या ऐवजी त्या नोकऱ्या स्थानिक तरुण तरुणींना द्याव्यात, अश्या मागण्या राज ठाकरे यांनी यावेळी केल्या.
यावेळी बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर , जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई हे या बैठकीला उपस्थित होते.
ट्रेंडिंग बातम्या-
अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी सोडण्यासाठी एस.टी. धावणार- परिवहनमंत्री
महत्वाच्या बातम्या-
लॉकडाऊन शिथील कसा करणार आहात ते सांगा? राज ठाकरेंचा सरकारला ‘मनसे’ सवाल
मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी
देवेंद्र फडणवीसांनी कालच्या प्रकारावर संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी- संभाजीराजे
Comments are closed.