बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अण्णा… सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका”

राळेगणसिद्धी |  मी फक्त अण्णांना एवढचं सांगितलं, “या सत्ताधारी नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका”, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज राज ठाकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची उपोषणस्थळी म्हणजेच राळेेगणसिद्धीत जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपल्या ‘मनसे’ या पक्षातर्फे अण्णांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.

ज्या माणसामुळे आपण मुख्यमंत्री झालो त्या माणसाची भेट घ्य़ायला अरविंद केजरीवाल यांनी यायला हवे होते. त्यांना आण्णांच्या आंदोलनाच्या अगोदर कोणीतरी ओळखत होते का?, अशा शब्दात त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली.

दरम्यान, अण्णा हजारे यांना मोदींच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेऊ नका पण आंदोलन जास्त ताणू नका, असं सांगितल्याचं राज यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘वाह रे सरकार तेरा खेल, मांगा न्याय मिला जेल…!’ भुजबळांचा भाजपवर निशाणा

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फेसबुकवरून जीवे मारण्याची धमकी

आयसीसी म्हणतंय, स्टंपच्या मागे धोनी असताना क्रिज सोडायचं नसतं!

-“या देशात ‘एक’ पंतप्रधान होते पण ते मुके होते”

पंतप्रधान मोदींविरोधात राज ठाकरेंचा ममता बॅनर्जींंना पाठिंबा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More