Top News

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपालांना भेटणार!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

लॉकडाऊन आणि अनलॉकदरम्यान समाजातील विविध घटक आपले प्रश्न घेऊन राज ठाकरे यांना भेटले आहेत. त्यात कोळी बांधव, डबेवाले, मंदिरे सुरु करण्यासंदर्भात काही शिष्टमंडळे आणि अन्य घटकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत.

प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र आता राज ठाकरे हे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत झालेल्या राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आहे.

महत्वाच्या बातम्या-

“शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही”

मराठी भाषिकांची मनापासून माफी मागतो, अशी चूक पुन्हा होणार नाही- जान कुमार

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

‘…तोपर्यंत आम्ही एकत्र’; ‘या’ काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

“आघाडी सरकार म्‍हणजे फेव्‍हीकॉलचा जोड, कधीही काहीही होऊ शकतं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या