लेकरांनो… चिखलातून बाहेर या; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राहिलेला व्यंगचित्रांचा अनुशेष भरुन काढण्यास राज ठाकरे यांनी सुरुवात केलीय. जातीपातीचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना राज यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून तडाखा दिलाय. 

दलित-मराठा जातीपातींच्या चिखलात भांडत आहेत. तर ब्राह्मणही त्याच चिखलात व्हॉट्सअॅपवर दंग आहे. बिनचेहऱ्याने जातीयवादी नेते दुरुन गंमत पाहात उभे आहेत. याठिकाणी भांडणाऱ्यांना शिवाजी महाराज संदेश देत आहेत, असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय. 

राज ठाकरे जातीपातीचं राजकारण करत नाहीत, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे. त्यामुळे स्वतः राजही अशाप्रकारच्या कृत्यांवर आपल्या फटकाऱ्यांच्या सहाय्याने टीका करताना दिसत आहेत.