भाजपच्या विजयापेक्षा राहुल मोठे, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र

मुंबई | गुजरात निवडणुकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला घाम फोडला होता. याचाच आधार घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी आणि कंपनीवर व्यंगचित्राच्या माध्यमातून हल्ला चढवलाय. 

भाजप जरी गुजरातमध्ये सत्ता राखण्यात यशस्वी ठरले असले तरी राहुल गांधींना या निवडणुकीनं मोठं केलं. राज यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. 

गेल्या काही दिवसांपासून राज सोशल मीडियापासून दूर होते. मात्र त्यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून राजकीय तसेच सामाजिक विषयांवर फटकारे मारण्यास सुरुवात केली आहे.