मोदी-शहा जोडगोळी आणि बिथरलेले नेते-कार्यकर्ते; राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या व्यंगचित्रातून मोदी-शहा जोडीला लक्ष्य केलंय. त्यांचं हे व्यंगचित्र सोशल मीडियावर चांगलंच शेअर केलं जातंय. 

‘काय, पटतंय का माझं मत?”, असं मोदी ओरडून आपले नेते आणि कार्यकर्त्यांना विचारत आहेत. यावेळी नेते आणि कार्यकर्ते बिथरलेले आहेत. तर मोदींच्या मागे शहा गोड हसत आहेत, असं या व्यंगचित्रात दाखवण्यात आलंय.

राजकीय पक्षांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवणे गरजेचे आहे, असं वक्तव्य नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी हे व्यंगचित्र काढलंय.